- सायबर पोलिसांनी केल आहे सावधान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२५) :- महिला दिनानिमित्त ‘डी मार्ट’ कडुन विशेष गिफ्ट व्हॉऊचर मिळणार असल्याचा फेक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. त्याबाबत व्हॉटसअॅपवर आलेली फेक लिंक ओपन करून नये, डीमार्ट संदर्भात येणा-या बनावट लिंक वर क्लिक करू नये व त्यामध्ये आपली वैयक्तिक व खात्याची माहीती देवू नका.
आपली गोपनिय माहिती खाते क्रमांक, एटीएम कार्ड नंबर, पासवर्ड, सीव्हीव्ही नंबर, इंटरनेट बैंकिंग आयडी पासवर्ड अशी कोणतीही संवेदनशील माहिती कोणालाही शेअर करून नये. फसवणुकीसंदर्भात संशय आल्यास सायबर हेल्पलाईन १९३० किंवा cybercrime.gov.in वर संपर्क साधा, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी केले आहे.
महिला दिनानिमित्त व्हॉट्सअॅप या सोशल मिडीयावर Dmart कडुन विशेष गिफ्ट व्हॉऊचर मिळणार असल्याचा दावा करणारी एक बनावट लिंक सर्वत्र प्रसारित होत आहे. लिंक ओपन केली असता, त्यामध्ये प्रश्न-उत्तरांची एक सिरिज दिली जाते. सुरुवातीला अगदी साधे-साधे प्रश्न विचारले जाऊन आपली वैयक्तिक व बँक खात्याची माहीती (एटीएम कार्ड नंबर, पासवर्ड, सीव्हीव्ही नंबर, इंटरनेट बैंकिंग आयडी पासवर्ड) घेतली जाते. त्यानंतर सायबर गुन्हेगार नमुद खात्याच्या माहितीचा वापर करून लोकांची फसवणुक करीत आहेत.















