न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०१९) :- लॅपटॉपला हॉटस्पॉट जोडण्याचा बहाणा करीत एका ठगाने मोटारचालकाच्या खात्यातील तीन लाख रुपये उडविले. मोटारचालकाचा विश्वास संपादन करून चोरट्याने त्याच्या बँक खात्यातील तीन लाख पाच हजार रुपये परस्पर हस्तांतरित केले.
निगडी येथे ६ ऑगस्ट २०१९ रोजी ही घटना घडली. याबाबत सोमवारी निगडी पोलीस ठाण्याज फिर्याद दाखल करण्यात आली आहे. समीर वसंत दिवेकर (वय २८, रा . मुंबई) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश मोहन बोंबले (रा. वेताळे, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे.
लॅपटॉपला हॉटस्पॉट जोडण्याच्या बहाण्याने आरोपी बोंबले याने फिर्यादी समीर यांचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल पळविला. बोंबले याने मोबाईल बँकिंगद्वारे समीर यांच्या बँक खात्यावरील तीन लाख पाच हजार रुपये परस्पर हस्तांतरित करून त्यांची मोबाइलसह तीन लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली.