न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०१९) :- यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयात दाखल झालेल्या तळवडे येथील २६ वर्षीय महिलेच्या पोटातील साडेतीन किलोचा डेसमाॅईड ट्युमर शस्रक्रिया करून यशस्वीरित्या काढल्याबद्दल अधिष्टाता डाॅ. संजय वाबळे, सर्जन डाॅ. संजय पाडाळे, सर्जन डाॅ. कांचन वायकोळे यांचा स्थायी समिती सभेत स्थायी सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, राजेंद्र गावडे, संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपस्थित होते.