न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२०) :- हिंजवडी फेज दोन मधील व्हेरॉक लायटिंग सिस्टिम प्रा. लि. कंपनीला भीषण आग लागली. ही घटना आज, मंगळवारी (दि. १८) पहाटे घडली. या कंपनीमध्ये वाहनांना लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तयार केले जातात
कंपनीमध्ये फोर व्हीलर गाड्याचे हेड लाईट, टेल लाईट बनवीत होते. हे बनविण्यासाठी लागणारे रबर, बेस कोट थिनर, हार्ड कोट थिनर, हार्ड कोट पेंट , बेस कोट पेंट, सिलिकॉन, अश्या काच्या मालाचा वापर केला जात होता. जवळ पास ८ एकरमध्ये कंपनीचा विस्तार आहे.
पीएमआरडीए अग्निशमन दल एमआयडीसी अग्निशमन दल व पुणे, पिंपरी चिंचवड, व विविध कंपनीमधील अग्निशमन दल कार्यरत होते १२ अग्निशमन वाहने व २० पाण्याचे टँकर द्वारे जवळपास १० तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. तिसऱ्या शिफ्टमध्ये रात्रपाळीने काम करणारे शंभर कामगार वेळीच बाहेर पडल्याने बचावले आहेत.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र अधिकारी एस टी इंगवले (एमआयडीसी), केंद्र अधिकारी सुजित पाटील (पीएमआरडीए) रामदास चोरगे (उप अग्निशमन अधिकारी) विजय महाजन (उप अग्निशमन अधिकारी) यांचे सहकार्य मोलाचे ठरले. यासोबत हितेश आहेर, राहुल शिरोळे,अक्षय शिंदे, वैभव कोरडे, उमेश फाळके, धनंजय भक्त , खेडेकर, कुलाल, गदाडे, ब्राम्हणकर, साठे, चावरे, भिवाटे, दत्ता, साळूखे, या सगळ्यामुळे हे शक्य झाले.