न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२०) :- पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. उन्नती सोशल फाउंडेशनच्या कुंदा भिसे, संजय भिसे, शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वॉटर फिल्टर, ऑक्सिजन ज्वलन, कॅलिडोस्कोप, ग्रहण, हातपंप, डीसी मोटार मशिन, भूकंप गजर, सूक्ष्मजीव निरीक्षक, होम हिटर, पाण्याचे विसर्जन, हायड्रॉलिक लिफ्ट, इलेकट्रिक रोबो, टॉर्च फॅन, रॉकेट लॉचेस, लेझर लाईट अलार्म, स्मार्ट डस्टबिन, सौरऊर्जेचा वापर, सौर चार्जर, पवन मिल, वॉटर सायकल, पाण्याचे कारंजे, स्वच्छ भारत अभियान, आर्मी रोड सेफ्टी, ड्रिल प्रेशर मशिन यासारखे लक्षवेधी प्रकल्प सादर केले.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.