न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी महापालिका प्रशासनाकडून आज सोमवारी (दि. २) रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अध्यक्षपदाच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अद्यापपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून संतोष लोंढे यांनी अर्ज दाखल केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही नगरसेवक पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
स्थायी समितीचे ८ सदस्य शनिवारी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) रोजी निवृत्त झाले आहेत. नव्या आठ सदस्यांची निवड बुधवारी (दि. २६) रोजी करण्यात आली आहे. समिती अध्यक्षाची निवड पुढील शुक्रवारी दुपारी बारा वाजता पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित केलेल्या विशेष सभेत केली जाणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे.