न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना मुंबई बंगलोर महामार्गावर वाकड येथे शनिवारी (दि. १४) रात्री घडली. आरिफ मोहम्मद पिरजादे (वय ३८, रा. आंबेवाड, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.
विशाल सिताराम कस्पटे ( वय ३४, रा. कस्पटे वस्ती, वाकड) या दुचाकीस्वाराने सोमवारी (दि. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री फिर्यादी विशाल कस्पटे व त्यांचा मित्र विशाल मानकर हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. ते वाकड येथील सूर्या हॉस्पिटलजवळ आले असता आरोपी आरिफच्या टेम्पोने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात मानकर व कस्पटे हे दोघेही गंभीर जखमी झाले.