न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागांत एसटी सेवा सुरू झाली असली तरी पुणे आणि पिंपरी, चिंचवड शहरातून प्रवासी वाहतूक न करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. १५) बारामतीवरून हडपसरपर्यंत आणि शिरूरवरून सोडण्यात आलेली एसटी बस वाघोलीपर्यंतच आली.
जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागांत सोमवारपासून एसटीची प्रवासी वाहतूक सुरू झाली. एका गाडीत २२ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच, प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर (दि. २५) मार्चपासून राज्यभरात एसटीची बस वाहतूक बंद आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर (दि. २३ मे) पासून जिल्ह्यात अंशतः प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. परंतु, अल्प प्रतिसादामुळे ती सेवाही बंद करण्यात आली. आता, पुन्हा सदर सेवा सुरू करण्यात आली आहे.