- मुलांनी रंगेहाथ पकडून केली धुलाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23. जून. 2020) :- एका बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या मैत्रिणीला भेटायला जाणे चांगलेच महागात पडले आहे . मैत्रिणीच्या घरी गेलेल्या बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या मुलांनी रंगेहाथ पकडले . त्यानंतर घरी आणून बांधकाम व्यावसायिकाला झोडपूनही काढले .
याबाबत पत्नी आणि दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना रनदीप कॉलनी , लक्ष्मीतारा गार्डन , डांगे चौक , वाकड येथे रविवारी ( दि. 21 ) रात्री घडली .
संजय ओमप्रकाश ससाणे ( वय 48 , रा , रनदीप कॉलनी , लक्ष्मीतारा गार्डन , डांगे चौक , वाकड ) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार , पत्नी पोर्णिमा संजय ससाणे ( वय 42 ) , मुलगा दीपक संजय ससाणे ( वय 21 ) , देवांग संजय ससाणे ( वय 18 ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. रविवारी ( दि .21 ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संजय त्यांच्या वाकड येथील एका मैत्रिणीला भेटायला गेले . त्यावेळी संजय यांची पत्नी आणि दोन्ही मुले संजय यांच्या नकळत त्यांच्या मागे आली. मैत्रिणीच्या घरात संजय आणि त्यांची मैत्रीण या दोघांना पती आणि दोन मलांनी बघितले. पोलिसांनी पोर्णिमा , त्यांची मुले आणि पती संजय यांच्यात समझोता घडवून आणला आणि सर्वांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले . त्यानुसार , संजय त्यांच्या पत्नी आणि दोन मुलासोबत घरी आले . त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोर्णिमा आणि दोन्ही मुले संजय यांच्या बेडरुममध्ये आले . त्यांनी संजय यांच्याकडील मोबाईल फोन , गाडीची चाची काढून घेतली . त्यानंतर पत्नीने संजय यांना पकडून ठेवले आणि मुलगा देवांग याने लाथाबुक्यांनी मारहाण केली . दुसरा मुलगा दीपक याने कंबरेच्या चामडी बेल्टने संजय यांना बेदम मारहाण केली . यामध्ये संजय यांच्या खांद्यावर , तोंडावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली . संजय यांना रक्तबंबाळ करून तिघेही निघून गेले . संजय यांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली . पोलिसांनी संजय यांच्या घरी जाऊन त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वाकड पोलीस तपास करीत आहेत.