न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचा सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम क्रमांक अथर्व राजाराम किरुलकर यांने ८ ९ .८३ टक्के गुण प्राप्त करून मिळवला आहे. तर द्वितीय क्रमांक जयेश कुमार प्रसन्न शेलुडकर ८३.१६ व तृतीय क्रमांक कलश प्रवीण सैतवाल ७८.३३ गुण मिळवून यशस्वी झाले.
शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे व मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना हे यश मिळवून देण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.