न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही कोरोनासंदर्भातील उपाययोजनांसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सात अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे ‘ ड ‘ व ‘ ग ‘ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील सर्व महापालिका रूग्णालयांतील स्वॅब टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोविड केअर सेंटरचे कामकाज सोपविले आहे. येथील रूग्णालय प्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांमीध्ये समन्वय ठेऊन कामकाज करण्यास सांगण्यात आले आहे. ‘ अ ‘ व ‘ ब ‘ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील पालिकेचे सर्व रूग्णालयातील स्वॅब टेस्टिंग, कॉन्टक्ट ट्रेसिंग कोविड केअर सेंटरची जबाबदारी उपजिल्हाधिकारी करमरकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
तर, ‘ ह ‘ व ‘ क क्षेत्रीय कार्यालयाची कार्यालयाची जबाबदारी तहसिलदार गीता दळवी यांच्याकडे, ई ‘ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सहायक निबंधक प्रवीण निनावे आणि ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सहायक निबंधक बी . आर . माळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तहसिलदार सुनील बेल्हेकर यांच्याकडे पालिका वॉर रूमचे कामकाज देण्यात आले आहे. या कामकाजाचे दैनंदिन अहवाल अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व वॉर रूमला देण्यात यावा, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे.