न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीचे दर सतत वाढताना दिसत आहेत. सोन्याच्या दरानं तर सध्या उच्चांकच गाठल्याचं पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात शुक्रवारी सोनाच्या किंमतीत ६८७ रूपयांची वाढ होऊन सोन्याचा दर ५४ हजार ५३८ रूपये प्रति १० ग्राम वर पोहोचला.
एचडीएफसी सिक्योरिटीजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. यापूर्वी गुरूवारी कामगाजाच्या अखेरिस सोन्याचा दर ५३ हजार ८५१ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचला होता. तर दुसरीकडे शुक्रवारी चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या किंमतीत २ हजार ८५४ रूपयांची वाढ होऊन ती ६५ हजार ९१० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गुरूवारी चांदीचा दर ६३ हजार ०५६ रूपये प्रति किलो इतके होते. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे.