न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका मामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (दि. १८) फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिला यांचा २२ वर्षीय भाऊ याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हा पीडित मुलीचा मामा आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपी मामा तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तसेच बेशुद्ध होईल, असे काहीतरी तिला प्यायला दिले. त्यानंतर तिच्याशी गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला.
महात्मा फुलेनगर, मोशी येथे गुरुवारी (दि. १७) दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८,११,१२ अन्वये बाल लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.