न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- त्रिवेणीनगर चौक व कृष्णानगर कॉर्नर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतुक थांबवन्यासाठी गेल्या महिन्यापासून दोन्ही चौकात रस्त्यावर मोठे सिमेंट पाईप टाकून रस्ता अडविला आहे. या सिमेंटच्या पाईपामुळे वारंवार छोटे – मोठे अपघात होत आहेत.
दोन वाहन चालकांमधे वाद होतात. वाहतुककोंडी होत आहे. प्रशासनाला कधी जाग येणार आणि हे पाईप केव्हा काढणार याची वाट येथील नागरिक पाहत आहेत. याबाबत भोसरी विधानसभेचे शिवसेना शहर संघटक रावसाहेब थोरात यांनी हे सिमेंट पाईप काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याची पालिकेकडे मग्न केली आहे.