न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- नवी सांगवीतील कीर्तीनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरामध्ये उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले ५ लाख ८१ हजार ५०० रुपये किमतीचे २३ तोळे ४ ग्राम वजनाचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६ लाख २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
संगीता अजित कांकरिया (वय ५२, रा. क्रांती चौक, कीर्ती नगर, नवी सांगवी) यांनी याबाबत शनिवारी (दि. १७) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.