न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- पीडित विवाहिता आणि आरोपी निलेश यांचा ८ जून २०१७ रोजी विवाह झाला. विवाह झाल्यापासून आरोपींनी विवाहितेकडे नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली.
तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार तिला शिवीगाळ करत मारहाण केली. यातून आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पती निलेश बद्दूसिंग चव्हाण, सासू बेबीबाई बद्दूसिंग चव्हाण, मोठा दीर नवल बद्दूसिंग चव्हाण, लहान नणंद रेखा राठोड (चौघे रा. माहुली, पो. भुली, ता. मानोरा, जि. वाशीम), मोठी नणंद सुषमा राठोड, नंदावा संतोष राठोड (रा. नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.