- वाढदिवसानिमित्त विधायक कार्यक्रमांचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे व कार्यक्षम नगरसेवक सभापती, भाजपचे भोसरी चर्होली मंडल अध्यक्ष राजेंद्रभाऊ लांडगे यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करावा, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजप भोसरी – चर्होली वैद्यकीय आघाडी अध्यक्ष विजयाताई आल्हाट यांनी आमदार महेश लांडगे व नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंबळी येथील अनाथ आश्रमामधील ४० मुलींची हिमोग्लोबिन व रक्त गट व आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक व भाजपचे भोसरी-चर्होली अध्यक्ष राजेंद्रभाऊ लांडगे, युवा नेते निलेश बोराटे, गुरुवर्य भगवताचर्य दाभाडे महाराज आळंदीकर व युवा कीर्तनकार विठ्ठल महाराज आळंदीकर,गिता महेंन्द्र, भोसरी चर्होली मंडल ओबीसी अध्यक्षा मनिषा डोने, प्रिती बोंडे, गायत्री तळेकर, मनिषा पांचाळ, सतिश जरे आदी मान्यवर उपस्थित होते.