न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- एच.एस. सी बोर्ड परीक्षेतील व एमएचटी सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सौरभ जोग मुलामधील ग्रुपमध्ये प्रथम आला. चिंचवडगांव येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला.
त्यात संस्थेचे सचिव राजेंद्र मुथा व सहसचिव अनिल कांकरिया, प्राचार्या सुनिता नवले, विज्ञान विभाग प्रमुख संजय पाटील, उपप्राचार्य श्री गुंजाळ आदीनी सौरभ जोग याचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सौरभ जोग एचएससी बोर्डातही घवघवीत यश संपादन केले होते.