न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तसेच सरळ सेवा भरती स्पर्धा परिक्षा भविष्यात होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुरु कराव्यात, अशी अनेक विद्यार्थी व पालकांची मागणी आहे.
अभ्यसिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्याना अभ्यास करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शहरातील अभ्यासिका लवकरात लवकर सुरु कराव्यात, अशी मागणी शहर मनसे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.