- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांच्या वतीने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवार (दि. १२) रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे व आदी मान्यवर उपस्थित होते.
शैलजाताई मोरे म्हणाल्या की, ‘राजमाता जिजाऊ या एक आदर्श गुरू आणि माता आहेत. त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची संकल्पना सांगितली व हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. त्यांचे अनुकरण आजच्या महिलांनी करावे.’
अनुप मोरे म्हणाले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती या सर्वांचे औचित्य साधून तरूणांनी आपले बहुमुल्य आयुष्य निर्व्यसनी ठेवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा व स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तरुणांनी राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून द्यावे.