न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- चाकणच्या माणिक चौकातील अंबिका ज्वेलर्स या दुकाणात सुनिल बबनराव अडाणी (रा. पावनधाम सोसायटी चाकण; मुळ रा.जालना) हा सेल्समन म्हणून कामास होता.
दरम्यान त्याने दुकातील ७,७७,७२१ रुपये किंमतीचे ९२.५, ९२.५७० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिण्यांवर हात साफ केला आहे. त्यात एक सोन्याची चैन, एक सोन्याचे गंठण, एक पेडल, टेम्पल डिझाईनचे दागिने चोरुन नेले आहेत.
याप्रकरणी सराफा व्यवसायिक सुशिल रामनिवास सोनी यांनी आरोपी सुनिल अडाणीच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चाकण पोलिसांनी २८०/२०२४ भा.दं.वि कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा यादव तपास करीत आहेत.