- यासह पोलीस अधिकाऱ्यांकडून आणखी एका पोलिसाचे निलंबन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत पोलीस शिपायाचे प्रेमसंबंध असताना झालेल्या वादातून पोलीस शिपायाने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना दिघी पोलीस ठाण्यात घडली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत या पोलीस शिपायाला तडकाफडकी निलंबित केले आहे.
याप्रकरणी तब्बल १८ दिवसांनी पोलीस शिपायावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या आणखी एका चिंचवड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचे देखील निलंबन करण्यात आले आहे.
पोलीस शिपाई अनिल संपत निरवणे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. नरवणे हे दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिक्षक महिलेसोबत मागील दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून नरवणे यांनी संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलीस शिपाई नरवणे याने पोलीस स्टेशनच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.