न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २२ फेब्रुवारी) रोजी २२३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील काळेवाडीमधील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०३४२१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९८३६२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८३१ जणांचा मृत्यू झालेला आहे.