- पाच अनधिकृत बांधकामांवर फिरविला बुलडोझर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) :- प्रभाग क्र. ०१ चिखली परिसरात सोमवारी (दि. २२) रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
यात एकूण ०५ अनधिकृत बांधकामावरील एकूण २९४८.२४ चौ. फुट (२७४.०० चौ.मी.) क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त अजित पवार, सहशहर अभियंता मकरंद निकम यांचे मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली व उपअभियंता सुधिर मोरे, विश्वनाथ राऊत व रविंद्र भोकरे कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक ०५ तसेच महापालिका अतिक्रमण पथक, जे.सी.बी. २ व मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने करण्यात आली.