- केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- देशात दुसरी लाट आल्यानंतर केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
सर्व शासकीय आणि खासगी करोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत.
वाढत्या लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लशींचा राज्यांना पुरेसा आणि वेळेवर पुरवठा केला जाईल, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाचा वेग वाढला तरी लशीचा तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही. राज्यांनी लसीकरणाची अद्ययावत आकडेवारी केंद्राला देणं गरजेचं असून, त्यानुसार लशींचा पुरवठा केला जाईल, असंही केंद्रानं राज्यांना म्हटलं आहे.