- नगरसेवक सचिन भोसले यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी नगरसेवक सचिन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून दिली आहे.
तर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भोसले यांची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, तर, गजानन चिंचवडे यांची मावळ, चिंचवड, पिंपरीच्या जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे.