निर्बंधानी व्यवसायीकांचे बारा वाजवणाऱ्या सरकार विरोधात आक्रमक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या ब्रेक दी चेन अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांना हॉटेल व्यवसायकांनी विरोध केला आहे. निर्बंध मागे घेण्याची विनंती हॉटेल व्यावायिकांनी केली आहे. निर्बंधांचं स्वरुप हे लॉकडाऊनप्रमाणे असल्याचं सांगत अशाने आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असं सांगत हॉटेल चालक व मालक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवार दि. ७ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. याला पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध म्हणून या लॉकडाऊन विरोधात गुरूवारी (दि.८ एप्रिल ) व्यापारी वर्गाचे बारा वाजवणाऱ्या सरकार विरोधात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाला भाजपा युवा मोर्चाने साथ देत अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, भोसरी चऱ्होली मंडल अध्यक्ष उदय गायकवाड आदी पदाधिकारी विविध ठिकाणी उपस्थित होते.