- पोलिसांकडून सहा जणांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- इमारतीच्या टेरेसवर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी सहा जणांना अटक केली. गुरुवारी (दि. ८) रात्री सुदर्शन चौक, पिंपळे गुरव येथे ही कारवाई करण्यात आली.
संदीप किसन रावते (४०, रा. पिंपळे गुरव), निखील नदकुमार पवार (३३, रा. नढे नगर, काळेवाडी), संदीप राजेंद्र वडमारे (२८, रा. पिंपळे गुरव), राज दत्तात्रय जाधव (३२, रा. नवी सांगवी), नवी दौलत शेख (३५, रा. भोसरी) उर्फ चित्रसेन भगवान घरवाहवे (२८ पिंपळे गुरव) अशी आरोपींची आहेत.
याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष बर्गे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाला पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौक येथील एका इमारतीच्या टेरेसवर काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून सहा जणांना ताब्यात घेतले.