न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य रुग्णांसाठी बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता यांनी पालिका हद्दीत विविध विकासकामे करण्या-या ठेकेदारांना त्यांचे सीएसआर (CSR) फंडातुन एक सामाजिक जबाबदारी म्हणुन मदत करण्याचे आवाहन केले होते.
त्यास प्रतिसाद देत मे. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी १० ली. क्षमतेचे १० ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर तसेच मे. अजवानी इन्फ्रा प्रा.लि. यांनी ५ ली. व १० मी. क्षमतेचे प्रत्येकी ५ ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर व मे.कृष्णाई कन्स्ट्रक्शन प्रा.लि. व मे.धनेश्वर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांनी प्रत्येकी ५०० पल्स ऑक्सीमीटर आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सपुर्त केले.
या प्रसंगी मातेरे क्न्स्ट्रक्शनचे मातेरे, अजवानी इन्फ्राचे सुनिल अजवानी, कृष्णाई क्न्स्ट्रक्शनचे करण भोसले व धनेश्वर कन्स्ट्रक्शनचे संजय गावडे तसेच बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे उपस्थितीत होते.