- शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमालीची घटली..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेने नेहरूनगर येथे जंबो कोवीड रुग्णालय सुरू केले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने पालिकेकडून ठेकेदाराला १५ सप्टेंबरपासून रुग्णालयातील काम थांबविण्याचा आदेश देण्यात आला आहे. मंगळवारी शेवटच्या पेशंटला डिस्चार्ज दिला आहे.
शहर परिसरातील दाखल रुग्णांची संख्या ३९३ वर पोहोचली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले आहे. वायसीएममधील अतिदक्षता विभागातील रुग्णही कमी झाले आहेत.
गणेशोत्सवानंतर कोरोनाचा आलेख काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. वायसीममधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गंभीर रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. सध्या आयसीयू एक आणि दोनमध्ये ३० रुग्ण दाखल आहेत, अशी माहिती वायसीएमचे प्रमुख डॉ. राजेश वाबळे यांनी दिली.