- जावई गजाआड; सासू गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- पिंपळे निलख येथील इंगवले चौकात बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जावयाने सासूला भररस्त्यात अडवले. शिवीगाळ करून सासूला खल्लास करण्याची धमकी देऊन लोखंडी टॉमीने डोक्यात मारून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने त्याच्या लहान मुलास मारहाण केली. त्यामुळे सासूने आरोपी जावयाला त्याबाबत जाब विचारला. त्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केले. गंभीर जखमी सासू बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजी संजय लोंढे उर्फ पप्या (रा. पिंपळे निलख), असे आरोपी जावयाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक हेमा सोळंंके यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे तपास करीत आहेत.