- मालकाची स्वतःच केली विधानपरिषदेवर निवड; पिंपरीतील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- वाहन चालकाने त्याच्या मालकाची विधान परिषदेवर निवड झाल्याचे आणि त्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालांची सही असलेले बनावट पत्र तयार केले. ते पत्र त्याने मालकाच्या भावाच्या व्हॉट्सअपवर पाठवले. फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे पत्र तयार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजीज नवाब शेख (वय ४३, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद ठोंबरे (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.