- वाकड पोलीस ठाण्यात महिलेची फिर्याद; आरोपीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलवरुन महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. हे फोटो आरोपीने महिलेला ई-मेलवर व तिच्या पतीला मोबाईलवर पाठविले.
तसेच, आरोपीने महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. २ मार्च २०२० ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत रहाटणीत ही घटना घडली.
पिडीत महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रणव अरविंद पांचाळ (रा. वडोदरा, गुजरात) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.