- अज्ञाताविरोधात सांगवी पोलीसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२१) :- पिंपळे गुरवमध्ये मिनी स्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने ७७ वर्षीय जेष्ठाची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीचे एटीएम घेऊन आरोपीने मिनी स्टेटमेंट काढून दिले.
मात्र, कार्ड परत देताना एटीएमकार्डची अदलाबदल करीत एसबीआय बँकेचे जयंतीलाल गोहिल नावाचे एटीएम आरोपीने फिर्यादी यांना दिले. फिर्यादीच्या एटीएम कार्डद्वारे परस्पर ५९,२०० रूपये काढून जेष्ठाची फसवणूक केली.
ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. रघुनाथ शंकर पाटील (वय ७७, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीसात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.