- चिंचवडमधील घटना; दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- चिंचवड येथील ऑटोक्लस्टर समोरून फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी दोन अनोळखी चोरटे दुचाकीवरून आले. त्यातील दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या शर्टची कॉलर पकडली. त्यामुळे दुचाकीवरून तोल जाऊन फिर्यादी रस्त्यावर पडले.
आरोपींनी फिर्यादीच्या पोटावर पाय देऊन मारहाण केली. शिवीगाळ करत ‘तुझ्याकडे जितके पैसे आहेत ते दे’ असा दम दिला. त्यानंतर तलवारीचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळयातील ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेली.
हा प्रकार सोमवारी (दि. २४) मध्यरात्री साडेबारा वाजता घडला. प्रशांत प्रदीप चौधरी (वय ३६, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.