- काळ्या फित बांधुन केंद्र सरकारचा जाहिर निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- केंद्र सरकारच्या महागाई दरवाढ विरोधात शहर शिवसेनेच्या वतीने ” शिव आक्रोश जन आंदोलन” करण्यात आले. शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली (दि. २५) रोजी हे आंदोलन झाले.
सकाळी १०.३० वा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, पिंपरी येथून आंदोलनास प्रारंभ झाला. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे इंधन, गॅस तसेच जीवनाश्यक वस्तूच्या दरवाढी विरोधात महिलांनी चूल पेटवून त्यावर भाकरी बनवली तसेच दोन चाकी वाहन बैलगाडीत ठेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अनेकांची मनोगत झाली.
आंदोलनात खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना प्रदेश संघटक गोविंद घोळवे, मा. आ. गौतम चाबुकस्वार, महिला संपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी, जिल्हा संघटीका सुलभा उबाळे, शैलजा खंडागळे, वैशाली मराठे, उपजिल्हा प्रमुख – निलेश मुटके, युवासेना शहर संघटक विश्वजित बारणे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष दस्तगिर मनियार, डॉ. जावेद अत्तार, शहर संघटक संपत पवार, शिवसेना आजी – माजी पदाधिकारी व महिला आघाडी, युवासेना, शिवसेना अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आदी सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी काळ्या फित बांधुन केंद्र सरकारचा जाहिर निषेध केला.