- एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; थरमॅक्स चौकातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- लाईट कनेक्शन कट केले. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीला एमएसईबी कार्यालयात जाऊन तोडफोड तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ, धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या गाडीत बळजबरीने त्यांना बसवून नेले.
ही घटना गुरुवारी (दि. २८) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास चिंचवड येथील थरमॅक्स चौकातील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड या कार्यालयात घडली. राहुल खंडेराव जाधव (वय ३०, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
रुपेश गोविंदन नामबियार (वय ३५, रा. आकुर्डी), रियाज जीलानी मोहोळकर (वय ३२, रा. बिजलीनगर, चिंचवड), रिजवान अशफाक शेख (वय ३२, रा. काळभोरनगर, चिंचवड), फैज निजाम सय्यद (वय ३२, रा. भोईर कॉलनी, चिंचवड), मोहसीन मकसूद भालदार (वय ३०, रा. सुदर्शन नगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यासह अरबाज हारून शेख (वय २९, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.