आवश्यक उपकरणे, साहित्य तसेच, सर्व प्रकारची औषधे खरेदी करता येणार….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. राजेंद्र वाबळे यांना १० लाखांपर्यंत खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. तसे, आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
वैद्यकीय विभाग, वायसीएम रुग्णालय व दवाखान्यांसाठी आवश्यक उपकरणे व साहित्य तसेच, सर्व प्रकारची औषधे असे ५ ते १० लाखांच्या खरेदीचे अधिकार आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय संचालक, वैद्यकीय अधिक्षक यांना प्रदान करण्यात आले होते. पालिकेच्या विविध विभागप्रमुखांच्या नियुक्त्या नव्याने ५ ऑक्टोबर २०२१ ला करण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय विभागाचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . गोफणे विभागप्रमुख आहेत. तर, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हे वायसीएमचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्या दोघांना १० लाखांपर्यंत खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत.