- सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रिय अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने जाधववाडी, कुदळवाडी येथे आज बुधवारी (दि. ८) रोजी प्रभाग २ मधील अनधिकृत बांधकामे व पत्राशेड इत्यादीवर निष्काशनाची कारवाई करणेत आली.
या कारवाईमध्ये एकूण ०९ अनधिकृत बांधकामे (२ पत्राशेड ७ आर.सी.सी.) बांधकाम निष्कासित करण्यात आली. या कारवाईचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे २२,००० चौ.फुट आहे.
सहशहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता, संजय घुबे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप.अभियंता, सुर्यकांत मोहिते, उप अभियंता सुधीर मोरे, क. अभियंता अमोल पडलवार व इतर ३ कनिष्ठ अभियंता, १२ बिट निरीक्षक, क व फ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण विभागाचे २८ पोलिस कर्मचारी, चिखली पोलिस स्टेशनचे पी.एस.आय १, पोलीस कर्मचारी ५, (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षारक्षक क क्षेत्रीय कार्यालय) ५८, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षा अधिकारी २, अग्निशामक दलाचे पथक व वैद्यकिय विभागाची रुग्णवाहिका, विद्युत विभागाचे कर्मचारी, मजूर २५, जे.सी.बी ३, पोकलेन २, डंपर, गॅस कटर, १ क्रेन rise boom मशीन, आदी मशिनरीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.