न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड संघटन सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांची संघटन सरचिटणीस पदाबरोबरच पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे समन्वयक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तीनही विधानसभेचे समन्वयक पदी नियुक्तीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. आगामी महापालिका निवडणुका तसेच अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांची निवड करण्यात आली आहे.