न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०२२) :- कोयता बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दापोडीत एकाला अटक केली. सौरभ ऊर्फ मसाल्या किशोर परदेशी (वय २२, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीकडे कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला दापोडीतील स्मशानभूमी समोरून ताब्यात घेतले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.