न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०२२) :- मौल्यवन वस्तु फिर्यादीला दाखवून त्यांचा विश्वास आरोपीने संपादित केला. त्यांच्याकडील यूएसडीटी डॉलर ही व्हर्चुअल करंसी ५ रुपये दराने स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीला ताथवडेतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले.
फिर्यादीकडून १० लाख रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना २६ फेब्रुवारी ते ६ मे २०२२ दरम्यान ताथवडे येथे घडली. प्रसाद नागेश शेट्टी (वय ३१ रा. कोथरूड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार शुभम हवा (रा. काटेवस्ती, पुनावळे) आणि केशव देवकर (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.