न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- संत तुकाराम हे वारकरी सांप्रदायाचे उर्ध्वयू आहेत. त्यामुळे त्यांचे शिल्प इंद्रायणी नदीपात्रात उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी सूचना पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.
पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमलाबाई रसिकलाल स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आरओ प्रकल्पयुक्त पाणपोई व जगद्गुरु तुकोबारायांच्या थेट डिजीटल दर्शन सेवेचा शुभारंभ सोमवारी (दि. १६) करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, आमदार सुनील शेळके, उद्योगपती दिना धारिवाल, प्रकाश धारिवाल, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितिन महाराज मोरे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे मोहनलाल अध्यक्ष लक्ष्मीकात खाबिया आदी उपस्थित होते.