- पालिकेकडून सल्लागाराची नेमणूक?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील जागेत पाच एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराची करण्यात येणार आहे. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील जागेत पाच एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र विकसित करण्यात येणार आहे.
हे मैलाशुद्धीकरण केंद्र विकसित करणे आणि त्याची अनुषंगिक कामे भौगोलिक परिस्थितीनुसार करण्यासाठी परिसराचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तो सर्व्हे करणे, डिझाईन करणे, विविध बाबींचे दर पृथ्थकरण करणे आणि त्यानुसार, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून अंदाजपत्रक बनविणे, तांत्रिक मान्यता घेणे आदी निविदापूर्व आणि निविदापश्चात कामे करावी लागणार आहेत.
या प्रकल्पाकरिता २२ मार्च २०२२ रोजी दरपत्रक मागविण्यात आले. त्यामध्ये अलायन्स इंजिनीअरिंग सर्व्हिसेस यांनी १.९० टक्के असा लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार, त्यांची या कामावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना प्रकल्प खर्चाच्या निविदापूर्व आणि निविदा पश्चात कामांसाठी एकूण १.९० टक्के शुल्क देण्यात येणार आहे.