न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२२) :- निगडीतील ओटा स्कीम समोरील इंद्रायणीनगर येथे फिर्यादीच्या भाच्याला आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून कानाखाली मारली. तसेच आरोपीने बोलावून घेतलेल्या आठ ते दहा मुलांनीही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादी यांच्या घरी आल्यानंतर आरोपी तेथे आले. मारण्याच्या उद्देशाने घरासमोर जमाव जमवला. दगडफेक केली. यामध्ये फिर्यादीसह आणखी एकाला दगड लागल्याने दुखापत झाली. तसेच फिर्यादीसह त्यांच्या नातेवाइकांना शिवीगाळ केली. घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षाची काच फुटली.
याप्रकरणी जमुना मख्खनसिंग बाधा यानी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कासीम शेख, शाहरुख शेख, सोहेल शेख, राजा, अफजल शेख व अन्य ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.