न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२२) :- इन्स्टाग्रामवरून फिर्यादी व आरोपीची ओळख झाली होती. फोनवर बोलण्यासाठी त्यांना धमकी द्यायचा. फिर्यादीशी लगट करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादीने प्रतिसाद न दिल्याने आरोपी त्यांच्या घरात शिरला.
त्यांच्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला. फिर्यादीला जोरात धक्का मारून खाली पाडल्याने त्यांना दुखापत झाली. रावेत येथे ही घटना घडली. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. अमित गंगाराम जगताप (वय २९, रा. श्रीराज रो हाऊस, रावेत) असे आरोपीचे नाव आहे. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.