न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०९ एप्रिल २०२५) :- भोसरी एमआयडीसी येथील वंडर कारमध्ये दुसऱ्याचे आधारकार्ड, लाईट बिल व पॅनकार्डच्या छायांकीत प्रतीचा गैरवापर करुन एजंटने बँकेमध्ये फिर्यादीच्या खोटया स्वाक्षरी केल्या. त्यांना जामीनदार म्हणुन दाखविले.
वाहन कर्जदार साळवे यांनी बँकेचे वाहन कर्जाचे हप्ते भरले नाहीत, त्यामुळे फिर्यादीचे सिबील स्कोर खराब होवुन नुकसान करुन फिर्यादीची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी विकास धिरेद्र झा यांनी अज्ञात इसम, वंडर कारचा एजंट याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्यावरून गुन्हा दाखल केला आहे.












