- सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ मार्च २०२६) :- “आज माझा वाढदिवस आहे” असा बहाणा करत ग्राहकाच्या वेशात आलेल्या व्यक्तीने ६ लाख ७९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन ज्वेलर्सची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मोशीतील बो-हाडेवाडी परिसरात उघडकीस आली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास न्यू गणेश ज्वेलर्स येथे घडली.
फिर्यादी गुलाब सिंग गेनसिंग चौहान (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सतीश ज्ञानदेव बालसिंगे (वय अंदाजे ४५, रा. भोसरी) याने दुकानातून सोन्याची चैन, लॉकेट व कडा असे एकूण ६,७९,००० रुपयांचे दागिने खरेदी केले. रकमेचा IDFC फर्स्ट बँकेचा चेक देत विश्वास संपादन करून तो दागिने घेऊन निघून गेला.
मात्र संबंधित खाते बंद असल्याने चेक पास झाला नाही. त्यामुळे ही आर्थिक फसवणूक उघड झाली. आरोपी अद्याप अटक नसून पुढील तपास पोउपनि पानसरे करीत आहेत.












