- चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- चिखली येथील मोरेवस्तीतील साने चौक येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास दोन टोळक्यामध्ये किरकोळ वादातून एकमेकांना मारहाण करण्यात आली. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले आहेत. कोयता हवेत फिरवुन दहशत निर्माण करण्यात आली. एकाच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरुन नेली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात एकमेकांच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी गणेश अंकुश राख यांनी फिर्याद दिली आहे. दुचाकीवरून जात असताना वळणावर पाय लागला म्हणुन ते थांबले. या गोष्टीचा राग येऊन आरोपी यांनी शिवीगाळी व दमदाटी करुन फिर्यादीला ‘तुम्ही तुषार भंडारीला ओळखता’. त्यावर माझा काहीही संबंध नाही आणि मला काहीही माहीती नाही असे फिर्यादीने म्हटले असता आरोपीने लहानेचा लहान भाऊ आहे मी, असे म्हणुन फोन करुन पोरांना बोलावुन घेतले. त्यातील एकाने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या भावाशी भांडणे करतोस काय असे म्हणुन कोयता फिरवुन दहशत निर्माण केली व भांडणात फिर्यादी विरोध करीत असतानाही फिर्यादीच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने कोणीतरी चोरुन नेली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी आरोपी १) ऋऋवी लहाने, २) योगेश लहाने, ३) अक्षय सपाकाळ, ४) अजय शामराव सोनवणे, ५) रोहण बाळासाहेब सांवत व त्याचे इतर चार साथीदार यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
तर अजय शामराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत ते रात्रपाळी डयुटीस कंपनीत जात होते. त्यावेळी आरोपी चौघेजण व दोन अनोळखी लोकांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन केली. “तु योगेश लहाने सोबत असतो काय ? तुला पण जास्त मस्ती आली आहे, पाठीमागील भांडणामध्ये तु वाचला आहे, तुला आता जिवंत सोडत नाही” असे म्हणुन त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो त्यांनी डावा हात डोक्याजवळ घेवुन अडवल्याने त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे व आरोपी क्र १ याने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवुन दहशत माजवली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी आरोपी १) गणेश राख, २) विनायक मोरे, ३) संकेत, ४) सौरभ ५) दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.