- पंधरा लाखांचे दागिने जप्त; सोनारासह आश्रय देणाराही अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- कुविख्यात दरोडेखोरांकडुन चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करीत बहुळ येथील दरोडयाचे दोन व रात्रीच्या घरफोडीच्या चार गुन्हयांची उकल करून एकुण १५ लाख रु. किंमतीचा सोन्याचा मुददेमाल जप्त केला आहे.
१) परश्या गौतम काळे, रा. देऊळगांव गलांडे, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, २) सचिन चंदर भोसले, रा. खरातवाडी, ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर, ३) भिमा आदेश काळे, रा. देऊळगांव गलांडे, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर, ४) धंग्या चंदर भोसले, रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर ५) राजेश अशोक काळे रा. रांजनगाव मज्जीद ता. पारनेर जि. अहिल्यानगर, ६) अक्षय ऊर्फ किशोर हस्तलाल काळे, रा. पिंपळगांव पिस्सा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर ७) विधीसंघर्षीत बालक आणि चोरीचा मुददेमाल घेणारा सोनार अभय विजय पंडीत, वय ३८ वर्षे, रा. सुतार गल्ली, कोळगांव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर आणि आरोपींना आश्रय देणारा व लपवुन ठेवणारा आरोपीतांच्या बहीनीचा पती गणेश शिवाजी काळे, रा. तांदळी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर अशी गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तपास पथकाने सलग १५ दिवस अहिल्यानगर जिल्हयात श्रीगोंदा, पारनेर, नगर तालुका, बीड जिल्हयातील आष्टी व पाटोदा या ठिकाणी गुन्ह्याचा तपास केला. गुन्हयातील अटक आरोपी यांनी चाकण पोलीस स्टेशन हददीत यापुर्वी दरोडा तसेच घरफोडी सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. सोनार आरोपी अभय विजय पंडीत यास आरोपीनी चोरुन आणलेले सोन्याचे दागीने हे गुन्हयातील मुददेमाल आहे असे माहित असुनही तसेच आरोपी हे रेकॉर्ड वरील कुविख्यात दरोडेखोर आहेत हे माहिती असुनही सोनाराने विकत घेतलेले एकुण १२ लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम सोन्याचे दागीने, व आरोपींकडुन रोख रक्कम जप्त केलेली आहेत. आरोपींनी श्रीगोंदा ते बहुळ व शेलपिंपळगाव चाकण येथे गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या तीन मोटार सायकल व घरफोडीची हत्यारे, मारहाण करण्यासाठी वापरलेली पालघन, तलवार, चाकु तसेच लोखंडी कटावणी, खुटटा असा एकुण सुमारे १५ लाख रुपयांचा मुददेमाल दरोडयाचे गुन्हयाचे तपासी अधिकारी पोनि गुन्हे श्री. नाथा घार्गे यांनी जप्त केलेल्या आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोनि गुन्हे नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रमुख सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि गणपत धायगुडे, पोसई दत्तात्रय सुकाळे पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, दत्ता टोके, राजु जाधव, अनिकेत पाटोळे, भैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, रुषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, नवनाथ खेडकर, सुनिल भागवत, उध्दव गर्जे, महेश कोळी, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, किरण घोडके, विकास तारु, कैलास गर्जे, प्रतिक चव्हाण यांनी केलेली आहे.